
Sangli Kharip Season : सांगली जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. बळिराजाची पेरण्यांची घाई सुरू आहे. या खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जूनअखेर तब्बल ८०१ कोटी ४० लाख रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात कर्जवाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ७० टक्के पूर्ण झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८८ हजार १५४ शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला असून, ३० सप्टेंबरपर्यंत कर्जवाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.