
मोहोळ : अनेक शासकीय रुग्णालयांत औषधांचा तुटवडा व इतर सोयीसुविधांची वानवा असते हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या सहा महिन्यांपासून क्ष-किरण तंत्रज्ञ व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची वानवा आहे. त्यामुळे दररोजच्या कामात सुसूत्रता येत नाही. या ग्रामीण रुग्णालयात महत्त्वाच्या अशा रुग्णांच्या दररोजच्या संबंधित असणारी विविध पाच पदे रिक्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. नूतन आमदार राजू खरे याकडे लक्ष देतील काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.