"पराभवाने खचून न जाता नागरिकांच्या हिताची सार्वजनिक व वैयक्तिक कामे, प्रश्न आदींसाठी प्रयत्नशील राहूया. मोर्चे, आंदोलने, लढे उभारून नागरिकांची सेवा करू."
शिराळा : ‘‘विधानसभेतील (Shirala Assembly Election) पराभवाची परतफेड जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकीत विजय मिळवून करा. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे,’’ असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक (Mansingrao Naik) यांनी चिखली (ता. शिराळा) येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिराळा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले.