Sangli : गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच हनुमान मंदिरासमोरील तुळशीचे लग्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच हनुमान मंदिरासमोरील तुळशीचे लग्न
गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच हनुमान मंदिरासमोरील तुळशीचे लग्न

गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच हनुमान मंदिरासमोरील तुळशीचे लग्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

 सांगली : सध्या सगळीकडेच तुळशीच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील येळावी येथील हनुमान मंदिरासमोर कित्येक वर्षांपासून तुळस वृंदावन आहे. परंतु, आजपर्यंत कधी ही मंदिरासमोरील तुळशीचा विवाह झाला नव्हता... मात्र इतिहासात पहिल्यांदाच गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाह पार पाडला... 

येळावी गाव वसल्यापासून हनुमान मंदिरासमोरील तुळशीचा विवाह झाल्याचे ऐकीवात नाही. यावेळी पुरोहित बंडोपंत जोशी, ओम शांती परिवारातील जयप्रकाश अण्णा पाटील, पोपटराव पाटील, आबा पाटील, जे पी साळुंखे, भिमराव साळुंखे, दिलिप कदम, मधूदादा पाटील, अविनाश अप्पा पाटील यांच्यासह स्थानिक मान्यवर उपस्थित होते..

loading image
go to top