कोरोना रुग्णालयाच्या उद्‌घाटनाला जमले अन्‌ 

corona
corona
Updated on: 

इस्लामपूर (सांगली) ः आठ दिवसापुर्वी इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात टाटा ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड हॉस्पीटलच्या उद्घाटनानंतर वाळवा तालुक्‍यात कोरोनाचे पेव आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या, काही विनाकारण लुडबूड करणाऱ्या अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात काही राजकीय पदाधिकारी, नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी "चूक झाली', हे कबूल करत कार्यकर्त्यांना "शहाणे व्हा, घरात रहा', असा संदेश पाठवला आहे. 


आठ दिवसापुर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्य मंत्री विश्‍वजीत कदम, आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील उपजिल्हा रुग्णालयात उभारलेल्या कोविड उपचार केंद्राचा उद्घाटन झाले. प्रमुख मंत्री उपस्थित असल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकारी हजर होते. उपजिल्हा रुग्णालयात उद्घाटन सोहळा पार पाडून येथील राजारामबापू नाट्यगृहात आढावा बैठक व कौतुक सोहळा पार पडला. या कौतुक सोहळ्यानंतर काही दिवसातच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. सोशल डिस्टन्सींगचा फज्जा, जमावबंदी आदेशाची पायमल्ली येथे झाली होती. अंमलबजावणी करणारेच कार्यक्रमाला उपस्थित असल्याने बोलणार कोण? आता मात्र साऱ्यांची अडचण झाली आहे. त्यानंतर लगेचच कार्यक्रमाचा इफेक्‍ट सुरु झाला.

 
काही नगरसेवक, काही अधिकारी व काही नेते गेल्या आठ दिवसात एक एक करुन कोरोना बाधीत येऊ लागले आहेत. आज खुद्द सदाभाऊ खोत यांना बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले. या कार्यक्रमानंतर ज्यांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आलेत त्यांनी खासगीत आम्हाला उद्घाटन सोहळ्यातच "प्रसाद' मिळाल्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. अनेकांनी स्वतःला कोरोनाबाधीत झालेल्या प्रशासकीय अधिकारी व नेत्यांच्या संपर्कात आल्याने घरात क्वारंटाईन करुन घेतले आहे. वास्तविक गेल्या दहा दिवसांपासून कोरोनाचा विळखा जोरदार आवळू लागला आहे. त्याचे गांभीर्य ओळखून अगदी मोजक्‍याच लोकांनी हा उद्घाटन सोहळा पार पाडायला पाहिजे होता; मात्र तसे न झाल्याने अनेकांना बाधा झाल्याची चर्चा सुरु आहे. 


दरम्यान, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पदाधिकारी व अधिकारी पॉझीटीव्ह आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी लुडबुड करीत होते, त्यांनी मात्र पॉझीटीव्ह आल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार न घेता कोल्हापूर, मुंबई किंवा अन्य ठिकाणी उपचारासाठी धुम ठोकल्याचे चित्र आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Islampur Police Arrest Two Suspects in Alleged Assault Case
Ped Water Shortage
Mumbai Bengaluru Special Train
TET Exemption Plea Rejected
Marathi News Esakal
www.esakal.com