प्रभू श्रीरामचंद्र मंदिराचा शुभारंभ तमाम भारतीयांसाठी आनंदाचा क्षण- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील 

विष्णू मोहिते
Wednesday, 5 August 2020

सांगली, ः प्रभू श्रीरामचंद्र मंदिराचा शुभारंभ क्षण हा तमाम भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम हे कायमच भारतीयांचे दैवत राहतील असे ट्‌वीट करुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदीराचे भूमीपूजन सोहळा पार पडत आहे. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्यांच्या इस्लामपूर मतदारसंघात बांधलेल्या राम मंदिराचा फोटोही यावेळी ट्विट केला आहे. आम्ही नेहमीच प्रभू श्री रामचंद्राची भक्तीभावे पूजा करतो असंही त्यांनी म्हटलं आहे. 

अयोध्दा येथे राम मंदिराचा भूमिपूजनाने नविन अद्याय सुरु होत आहे. बऱ्याच दिवसानंतर आणि न्यायालयीन लढ्यानंतर भूमिपूजनाचा दिवस उजाडला आहे. या निमित्ताने अयोध्देसह देशातील राममंदिरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 
................ 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration of Prabhu Shri Ramchandra Temple is a moment of joy for all Indians - NCP State President Jayant Patil