बिबट्या आला आणि सागरेश्वर अभयारण्याचे उत्पन्न घटले 

स्वप्नील पवार 
Friday, 18 December 2020

 देशातील पहिले मानवनिर्मित यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याला हरणांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते

देवराष्ट्रे - सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर या देशातील पहिल्या मानवनिर्मित अभयारण्यात बिबट्याचे आगमन झाल्याने शेतकरी, नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांतून मागणी होत आहे. त्यात सागरेश्वर अभयारण्याचे उत्पन्न कमी झाले आहे. अभयारण्याच्या उत्पन्नातून परिसरातील गावांमध्ये विकासकामे केली जातात. परंतु अभयारण्याचे उत्पन्न कमी झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.

 देशातील पहिले मानवनिर्मित यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याला हरणांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. याठिकाणी बिबट्याचे आगमन झाले आहे. अभयारण्याशेजारील शेतकरी तसेच लोकवस्ती असणाऱ्या ठिकाणी भीतीचे वातावरण आहे. त्यात अभयारण्यात बिबट्या आल्याने पर्यटकांची संख्या वाढायला हवी होती तिथे पर्यटकांनी सागरेश्वर अभयारण्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. 14 डिसेंपर 625रु, 16 570रुपये 17 डिसेंबर रोजी 320 रुपयांचेच उत्पादन उभयारण्याला मिळाले आहे. मागील काही दिवसात अभयारण्याचे उत्पन्न हजार रुपयांच्या आत आहे.

वन्यजीव विभागाकडूनन दुचाकी गाडीवरून प्रवेश बंद करण्यात आला असून फक्त मोटारगाडीलाच प्रवेश दिला जात आहे. दुचाकीवरून पर्यटनास येणारा वर्ग जास्त होता. परंतु बिबट्या आला आणि दुचाकीस्वारी बंद केली. याचा परिणाम उत्पन्नावर होत असल्याचे दिसत आहे.

हे पण वाचाब्रेकिंग ; दहा लाखाची लाच घेताना प्राप्तिकर विभागाचा अधिकारी जाळ्यात 
 
दुचाकीवरून आलेल्या पर्यटकांना अभयारण्याची सफर करायची असते. परंतु प्रवेश नसल्याने नाराज होऊन परतावे लागते. यासाठी वन्यजीव विभागाने लवकरात लवकर सफारी गाडीचे नियोजन करावे अशी मागणी पर्यटकामधून होत आहे.

 सागरेश्वर अभयारण्यात बिबट्या आल्याने दुचाकी गाडी व चालत जाणाऱ्या पर्यटकांना अभयारण्यात बंदी घातली आहे. यामुळे उत्पन्नात घट झाल्याचे दिसून येत आहे. वन्यजीव प्रशासन लवकरच सफारी गाड्यांचे नियोजन करणार आहे. 

-अनिल जेरे, सहाय्यक वन संरक्षक, यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: income decrease of sangli Sagareshwar Sanctuary