जिल्ह्यातील दहा आगारातून बसेस फेऱ्यात वाढ : अमृता ताम्हनकर...कोणतीही भाडेवाढ नाही

घनश्‍याम नवाथे
Thursday, 8 October 2020

सांगली-  कोरोनाच्या आपत्तीमध्ये तोट्यात आलेल्या एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्‍य सार्थ ठरवत वाहतूक सुरू केली आहे. सांगली जिल्ह्यातून आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक सुरू आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी जिल्ह्यातील दहा आगारातून लांबपल्ल्याच्या आणखी काही सेवा सुरू करण्यात येत असल्याची माहिती विभाग नियंत्रक अमृता ताम्हनकर यांनी दिली. 

सांगली-  कोरोनाच्या आपत्तीमध्ये तोट्यात आलेल्या एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्‍य सार्थ ठरवत वाहतूक सुरू केली आहे. सांगली जिल्ह्यातून आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक सुरू आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी जिल्ह्यातील दहा आगारातून लांबपल्ल्याच्या आणखी काही सेवा सुरू करण्यात येत असल्याची माहिती विभाग नियंत्रक अमृता ताम्हनकर यांनी दिली. 

लॉकडाउन काळात जिल्ह्यात अडकलेल्या प्रवाशांना राज्यातील विविध भागात तसेच राज्याबाहेरही सुखरूप सोडण्याची कामगिरी सांगली विभागाने बजावली होती. त्यानंतर लॉकडाउनमध्ये शिथीलता आल्यानंतर जिल्हांतर्गत तसेच नंतर आंतरजिल्हा व आंतरराज्य वाहतूक सुरू आहे. त्याचबरोबर माल वाहतूक देखील सुरू आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी जिल्ह्यातील दहा आगारातून लांबपल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात येत आहेत. तसेच प्रत्येक फेरीनंतर गाडी निर्जंतुकीकरण करून वापरली जाते. "नो मास्क- नो सवारी' हे अभियान देखील राबवले जात आहे. लॉकडाउन काळात निम्म्या क्षमतेने तसेच सध्या पूर्ण क्षमतेने बसेस धावत आहेत. त्यासाठी कोणतीही भाडेवाढ करण्यात आली नाही. प्रवाशांनी राज्य महामंडळाच्या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही विभाग नियंत्रक ताम्हनकर यांनी केले. 

आगारनिहाय वाढवलेल्या फेऱ्या व कंसात गाडी सुटण्याची वेळ : सांगली आगार- औरंगाबाद (6.15 वाजता), नाशिक (8.45), (16.45), स्वारगेट (शिवशाही 10.30), चिंचवड (शिवशाही 15.30), विश्रामबाग ते स्वारगेट (शिवशाही 22.45). मिरज आगार- ठाणे (9.15), जमखंडी पुणे (जमखंडीहून 9.30), स्वारगेट (शिवशाही 22.15). इस्लामपूर आगार- मुंबई सेंट्रल (10.00), स्वारगेट (6.00), नाशिक (11.00), बारामती (7.15). तासगाव आगार- पणजी (7.45), औरंगाबाद (9.20), बारामती (9.00), स्वारगेट (13.00), नाशिक (15.00). विटा आगार- मुंबई (8.30), पुणे (5.45), (12.00), चिंचवड (15.15). जत आगार- परेल (8.00), उमरगा (13.30), मुंबई (19.15). आटपाडी आगार- मुंबई (7.30), मुंबई (18.00). कवठेमहांकाळ आगार- चिंचवड (10.00), नांदेड (8.00), परेल (7.00), स्वारगेट (12.40). शिराळा आगार- अक्कलकोट (8.00), परळी वैजनाथ (8.45). पलूस आगार- औरंगाबाद (7.30), पिंपरी चिंचवड (14.00). 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in bus service from ten depots in the district: Amrita Tamhankar