निपाणीच्या रस्त्यावर लाखभर गाड्यांची धूम...

increase quantity of two wheelers in nipani
increase quantity of two wheelers in nipani

निपाणी (बेळगाव) - निपाणी हे कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले शहर आहे. येथे विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांसह व्यावसायिक आहेत. त्यामुळे दुचाकींचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे. चिक्कोडी तालुक्‍यात 2019 मध्ये तब्बल 13 हजार 642 दुचाकी रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यामुळे निपाणी आणि चिक्कोडी परिसरातील रस्त्यावर धावणाऱ्या दुचाकींचा आकडा अडीच लाखांवर पोचला आहे. एकूणच वाहनांपैकी दुचाकींचे प्रमाण जास्त असल्यामुळे निपाणीची ओळख दुचाकींचे शहर अशी होऊ लागली आहे. 

अपघातामध्ये ही वाढ 

शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा वेगळ्या कारणांमुळे निपाणीतील आणि परिसरातील घरात सध्या दोन दुचाकी पाहावयास मिळत आहेत. तसेच बाहेरून येथे येणारे विद्यार्थी दुचाकींचा सर्रास वापर करीत आहेत. माध्यमिक शाळांतील विद्यार्थीही शाळेत आणि शिकवणीसाठी जाताना दुचाकी वापरत आहेत. निपाणीतील रस्त्यावर अडीच लाख दुचाकी धावत आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. तालुक्‍यात मागील वर्षभरात दुचाकी, कार, ट्रॅक्‍टर, ऑटोरिक्षा मिळून 23 हजार 821 वाहने रस्त्यावर उतरली आहेत. त्यामुळे येथील वाहने तीन लाखांच्या आसपास पोहोचली आहेत. निपाणीत दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यापाठोपाठ कार, रिक्षा, ट्रॅक्‍टर अशा वाहनांची संख्या पाहण्यास मिळत आहे. वाहनांची संख्या वाढत चालली असून रस्त्यावरील अपघातही होत आहेत. गेल्या वर्षभरात चिक्कोडी विभागात अपघातामध्ये 76 जणांचा मृत्यू झाला असून 321 जण जखमी झाले आहेत. 

निपाणी, चिक्कोडी भागात नोकरदार, शेतकरी व व्यावसायिकांची संख्या जास्त आहे. प्रत्येकांना दुचाकीची गरज बनली आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांमध्येही दुचाकीचे खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्त्यावर दुचाकींची संख्या वाढली आहे. मात्र प्रत्येक वाहनधारकांनी काळजीपूर्वक वाहने चालवणे ही जबाबदारी आहे. 
- भीमनगौडा पाटील, आरटीओ,चिक्कोडी  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com