
म्हैसाळ : आरोग्याच्या बाबतीत सर्वसामान्य सजग होताना दिसत असून देशी गायीचे दूध वापरण्याकडे ग्राहकांचा कल वाढू लागलेला आहे. यातून पशुपालकांसह यात येणाऱ्या नवागतांना व्यवसायाची संधी निर्माण होताना दिसत आहे. याला शासनाने अनुदानाचा ‘बूस्टर’ डोस देण्याचा केलेला प्रयत्न खासगी दूध संकलन केंद्रांच्या अनास्थेमुळे फोल ठरण्याची शक्यता जाणकारांतून व्यक्त होत आहे.