
शिंदेवाडी (ता. मिरज) येथे ग्रामपंचायतीत 30 वर्षांनी सत्तांतर झाले. माजी पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रवादीचे नेते शंकर पाटील यांच्या 30 वर्षांच्या एकहाती सत्तेला धक्का बसला. शिंदेवाडीत ऐतिहासिक सत्तांतर झाले. जय हनुमान विकास शेतकरी पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाले.
आरग : शिंदेवाडी (ता. मिरज) येथे ग्रामपंचायतीत 30 वर्षांनी सत्तांतर झाले. माजी पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रवादीचे नेते शंकर पाटील यांच्या 30 वर्षांच्या एकहाती सत्तेला धक्का बसला. शिंदेवाडीत ऐतिहासिक सत्तांतर झाले. जय हनुमान विकास शेतकरी पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाले.
"जय हनुमान पॅनेल' ने परिवर्तन घडवून नऊ पैकी आठ जागा जिंकल्या. शंकर पाटील यांना एका जागेवर समाधान मानावे लागले. विजयानंतर "जय हनुमान पॅनेल' च्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव केला. तीस वर्षात विकासात खंड पडल्याने जनतेने परिवर्तनाचा कौल दिला. जय हनुमान विकास शेतकरी पॅनेलच्या विजयी उमेदवारांनी घरोघरी साखर वाटून आनंदोत्सव केला.
सचिन पवार म्हणाले,""मतदारांनी विश्वास ठेवून विजयी कौल दिला. परिवर्तन घडवले. या विश्वासाला पात्र राहून अंतर्गत रस्ते, गटारी, गावातील मुख्य व शेत रस्ते आणि सुशोभीकरण करू. पुढील काळात गट न मानता गावच्या विकासासाठी 24 तास प्रामाणिकपणे काम करू असे म्हणाले.
विजयी उमेदवार ः वॉर्ड 1 - उत्तम रघुनाथ पाटील, रूपाली पोपट माने, महादेव तुकाराम लवटे.
वॉर्ड 2 - लक्ष्मण विलास साळुंके, सविता अविनाश पाटील, वंदना विजय पवार. वॉर्ड 3 - रेखाताई विठ्ठल सुतार, संदीप कृष्णा पाटील, भारती रामचंद्र पाटील.
संपादन : प्रफुल्ल सुतार