Solapur Miraj special train timetable November 2026
esakal
मिरज : कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मिरजमार्गे दोन विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचे नियोजन केले (Miraj Latur special train schedule 2026) आहे. सोलापूर-मिरज-सोलापूर आणि मिरज-लातूर-मिरज या दोन मार्गांवर या विशेष गाड्या धावणार आहेत. त्यामुळे मिरज, सांगलीसह कवठेमहांकाळ, जत, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, बार्शी आणि धाराशिव परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.