संसर्ग वाढला ! सोलापूर ग्रामीणमध्ये प्रथमच 61 कोरोना पॉझिटिव्ह; पाचजणांचा मृत्यू 

corona.gif
corona.gif

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात आज 61 व्यक्‍तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या 477 झाली असून शुक्रवारी (ता. 3) 14 व्यक्‍तींना घरी सोडण्यात आले. अद्याप 261 रुग्णांवर उपचार सुरु असून माळशिरस, मंगळवेढा व सांगोला तालुके कोरोनामुक्‍त झाले आहेत. दुसरीकडे मात्र, दक्षिण सोलापूर तालुका आता कोरोनाच्या हॉटलिस्टवर आला आहे. 


'या' गावांमध्ये शुक्रवारी सापडले कोरोनाचे रुग्ण 
मोहोळ तालुक्‍यातील मसले चौधरी, माढा तालुक्‍यातील आकुंभे, रिधोरे, भोसरे, तर उत्तर सोलापुरातील एकरुख, हगलूर आणि अक्‍कलकोट तालुक्‍यातील बोरगाव दे., बनजगोळ, कल्लाप्पावाडी, दुधनी, समता नगर याठिकाणी नवे रुग्ण सापडले आहेत. करमाळा तालुक्‍यातील जिंती, दक्षिण सोलापुरातील मुळेगाव तांडा, कुंभारी, होटगी, होटगी स्टेशन, मुळेगाव, हत्तूर, वांगी, बोळकवठा, नांदणी, उळे, नवी विडी घरकूल आणि बार्शी तालुक्‍यातील सबजेल तहसिल ऑफीस, नागणे प्लॉट, कसबा पेठ, उपळाई रोड, मंगळवार पेठ, वैराग, साकत पिंपरी याठिकाणीही रुग्ण सापडले आहेत. 

तालुकानिहाय एकूण रुग्णसंख्या 

  • तालुका      एकूण रुग्ण 
  • अक्‍कलकोट  84 
  • बार्शी           81 
  • करमाळा      04 
  • माढा            11 
  • माळशिरस    05 
  • मंगळवेढा     00 
  • मोहोळ          25 
  • उत्तर सोलापूर 47 
  • पंढरपूर         21 
  • सांगोला         03 
  • दक्षिण सोलापूर 196 
  • एकूण          477  

प्रशासन हतबल अन्‌ कोरोनाचा झाला 'ग्रामीण'ध्येही कहर 
सोलापूर ग्रामीणमधील आतापर्यंत चार हजार 402 व्यक्‍तींपैकी 476 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह सापडले आहेत. शुक्रवारी (ता. 3) ग्रामीणमध्ये प्रथमच 61 रुग्ण सापडले असून त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आता शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा वाढला आहे. त्यामुळे प्रशासन आता हतबल झाले असून कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभारले आहे. मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील 80 वर्षीय पुरुष, मसले चौधरी, आष्टे (ता. मोहोळ) येथील 46 वर्षीय पुरुषाचा तर 72 वर्षीय महिलेचा आणि वैरागमधील परीट गल्लीतील 85 वर्षीय पुरुष तर लोंढे गल्लीतील 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com