Mumps Infection : इटकरे येथे गालगुंड आजाराची साथ; प्राथमिक गटातील ८० टक्के विद्यार्थ्यांना बाधा, वेळीच औषधोपचारांचा सल्ला

पंधरा वर्षांपर्यंतची मुले आजारास लगेच बळी पडतात. गावात काही नागरिकांनाही आजार झाला आहे.
Mumps Infection
Mumps Infectionsakal
Updated on

इटकरे : येथील ऐंशी टक्के विद्यार्थी संसर्गजन्य गालगुंड आजाराने त्रस्त आहेत. आजार गंभीर नसला तरी विद्यार्थ्यांना आठवडाभर वेदना सहन कराव्या लागताहेत. साथ नियंत्रणासाठी वेळीच औषधोपचार घ्यावा, असा डॉक्टरांचा सल्ला आहे.

प्राथमिक शाळेत २०५ विद्यार्थी आहेत. दीडशे ते पावणेदोनशे विद्यार्थ्यांना आजार झाला आहे. माध्यमिक शाळेत प्रमाण कमी आहे. पंधरा वर्षांपर्यंतची मुले आजारास लगेच बळी पडतात. गावात काही नागरिकांनाही आजार झाला आहे.

गालगुंड आजारास इंग्रजीत ‘मम्प्स’ म्हणतात. लाळपिंड शोध असेही म्हणतात. विषाणूंच्या संसर्गामुळे प्रसार होतो. कानापुढे व गालाच्या खालील भागात असलेल्या लाळ ग्रंथी सुजून वेदना होतात.

गालगुंडग्रस्त व्यक्तीच्या चेहऱ्यावर एकाच बाजूला सूज दिसत असली तरी बहुतांश प्रमाणात दोन्ही बाजूंच्या ग्रंथी बाधित होतात. त्याचा संसर्ग शरीराच्या अन्य भागाला होऊन परिणाम होऊ शकतो. गालगुंड झालेल्या व्यक्तीच्या लाळीत असलेल्या विषाणूद्वारे या रोगाचा प्रसार होतो.

बाधित व्यक्ती खोकल्यास, शिंकल्यास हे विषाणू हवेत पसरतात. आजूबाजूच्या व्यक्तीच्या श्वसनमार्गातून शरीरात प्रवेश करतात. बाधिताचे अन्नसेवन केल्यास रोगप्रसार अधिक होतो. बाधा झाल्यानंतर १६ ते २१ दिवसांनंतर रोगाची लक्षणे दिसू लागतात.

सर्दी, डोकेदुखी, ताप ही प्राथमिक लक्षणे आहेत. ताप आल्यानंतर लाळ ग्रंथी बाधित होतात. गालगुंड हा आजार सौम्य असला तरी दुर्लक्ष करू नये, असे असे वैद्यकीय अधिकारी सांगतात. गर्दीच्या ठिकाणी फैलाव वेगाने होतो.

कोणत्याही वयाच्या व्यक्तीला हा आजार होत असला तरी पाच ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलांत प्रमाण अधिक आहे. मात्र तो दोनदा होत नाही. लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती निर्माण होते. ती वेळेत घेणे आवश्यक आहे. शिक्षक, पालकांनी सजगता ठेवली पाहिजे.

Mumps Infection
Sangli News : किल्लेमच्छिंद्रगड येथील पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याचे प्रवाह बदलल्याने तलाव, गावतळे पडले कोरडे

गालगुंड संसर्गजन्य रोग ‘पॅरामिक्झो’ विषाणूमुळे होतो. बालकांना सव्वा व पाचव्या वर्षी गोवर, गालगुंड, वारफोड्या यांची एकत्रित लस (एमएमआर) दिली जाते. वेळेत व योग्य औषधोपचार केल्यास साथ आटोक्यात राहते. दोन-तीन आठवडे आजाराचा प्रभाव राहतो. वेदना राहतात. भीतीचे कारण नाही. विद्यार्थ्यांनी विश्रांती घ्यावी.

-डॉ. सुशांत कदम, इटकरे.

आजारी मुलांची काळजी घेतली आहे. औषधोपचारासाठी पालकांना सूचना देत आहोत. वर्गात गर्दी कमी करणे किंवा विद्यार्थ्यांना विश्रांतीसाठी काळजी घेतली आहे. "

-सर्जेराव पाटील, मुख्याध्यापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com