esakal | कवलापूरला कोरोनाचा शिरकाव 
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

कवलापूर, ः येथील एक महिला व तिच्या बहिणीचा मुलगा असे कोरोना बाधित झालेत. हे दोघे बेळंकी येथील कोरोना बाधितांच्या संपर्कात आले होते. ग्रामपंचायत, आरोग्य विभागाने तातडीने चावडी मागील भागात कंटेन्मेंट झोन तयार केला.

कवलापूरला कोरोनाचा शिरकाव 

sakal_logo
By
विष्णू मोहिते

कवलापूरला कोरोनाचा शिरकाव 

कवलापूर, ः येथील एक महिला व तिच्या बहिणीचा मुलगा असे कोरोना बाधित झालेत. हे दोघे बेळंकी येथील कोरोना बाधितांच्या संपर्कात आले होते. ग्रामपंचायत, आरोग्य विभागाने तातडीने चावडी मागील भागात कंटेन्मेंट झोन तयार केला.

रूग्णाच्या संपर्कातील सात जणांना संस्थात्मक तर 16 जणांना होम क्वारंटाईन केले. आरोग्य विभागाच्या 10 टीमने सुमारे 489 कुटुंबातील 2300 ग्रामस्थांच्या आरोग्याचा सर्व्हे पूर्ण केला. दरम्यान, कवलापूर गावात पाच दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. 

बेळंकी येथील वृध्द दापत्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कात कवलापूर येथील एक महिला व तिची मुलगी आली होती. त्यांचा एक तरूण नातेवाईक कवलापुरला आला होता. कवलापूर येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी तिघांची तपासणी केली. 36 वर्षीय महिला व 23 वर्षीय तरूणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

माहिती मिळताच कवलापूर येथील कोरोना नियंत्रण समितीचे प्रकाश हाक्के, बजरंग पाटील, निवासबापू पाटील, भानुदास पाटील, संपत पाटील यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एल. शेळके यांच्या पथकाने धाव घेतली. आरोग्या तपासणीत हायरिस्क व्यक्ती, साठ वर्षांवरील जेष्ठ, गंभीर आजारी म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह असलेल्या रूग्णांची यादी तयार करण्यात आली. अत्यावश्‍यक सेवा वगळून कवलापुरातील इतर सर्व व्यवहार पाच दिवस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.