लंगरपेठ गावाची माहिती आता मिळणार एका क्‍लिकवर

Information about Langarpeth village will now be available at a click
Information about Langarpeth village will now be available at a click
Updated on: 

ढालगाव : लंगरपेठ (ता. कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायत ही "ई-ग्राम झाली' आहे. यासाठी ग्रामपंचायतीने "सकाळ' व ऍग्रोवन "ऍग्रोटेक इंडस्ट्रीज'शी करार केला आहे. लंगरपेठ गावातील घडामोडी, विकासकामे, जगभरातील ताज्या घडामोडी याची माहिती लोकांना घरबसल्या मिळणार आहे. तर शेतकऱ्यांना शेतीविषयक सखोल माहिती, ज्ञान, बाजारभाव यांची माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे. सरपंच महेश पवार यांनी करारपत्र "ऍग्रोवन ऍग्रोटेक इंडस्ट्रीज प्रा. लि.चे प्रतिनिधी प्रीतम बुधावले यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. 

ग्रामपंचायतीने केलेली विकासकामे जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ई-ग्राम ऍप हे चांगले माध्यम आहे. ऍपद्वारे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांचे छायाचित्र, माहिती समाविष्ट होणार आहे. ग्रामपंचायत कर या "ई-ग्राम' ऍपद्वारे भरता येतील. आधार कार्ड, पॅन कार्ड, ईपेमेंट ऑनलाईन घरपट्टी घरातून भरता येणार आहे. दंवडी व नोटीस देता येईल. गावाची पायाभूत माहिती, वैशिष्ट्य, विकास आराखडा मांडता येईल. या ऍपद्वारे इतरांच्या जाहिराती करता येणार आहेत. यातून ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा नवा मार्ग उपलब्ध होईल. 

यावेळी उपसरपंच यशवंत शिंदे, विश्‍वनाथ सूर्यवंशी, दिलीप पाटील, शरद घूले आक्काताई शिंदे, द्रौपदी बंडगर, दिपाली सावंत, सीमा पाटील, विमल बंडगर व ग्रामसेवक विकास माने, "सकाळ'चे बातमीदार दीपक सूर्यवंशी, कृषि विभागाचे सरक व संजय गरड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

बदलत्या काळानुसार लोकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, ग्रामपंचायतीने केलेली विकासकामे लोकांपर्यंत जावीत. यासाठी ई-ग्राम हे ऍप उपयुक्त ठरेल. 
- महेश पवार, सरपंच लंगरपेठ. 

स्पर्धेच्या काळात प्रशासन ही बदलत चालले आहे. ई-ग्राम ऍपद्वारे शासकीय निर्णय लवकर समजतील. लोकांच्या तक्रारीचे निराकरण होईल. गावातून बाहेर असणाऱ्या लोकांना गावची इंत्थभूत माहिती मिळेल. गावाविषयी अस्था निर्माण होईल. 
- विकास माने, ग्रामसेवक, लंगरपेठ.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com