कोरोना झालाय, सांगलीतील रुग्णालयात दाखल व्हायचाय? मग 'हे' घेतील तुमची जबाबदारी

the information of corona related hospital numbers detailed in sangli useful to people
the information of corona related hospital numbers detailed in sangli useful to people

सांगली : सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व वाढती रूग्ण संख्या पाहता ज्या खाजगी हॉस्पीटलमध्ये बेडची सुविधा आहे असे खाजगी हॉस्पीटल कोविड-19 विषाणूबाधित रूग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करून घेण्यात येत आहेत. उपलब्ध केलेल्या हॉस्पीटलमध्ये दाखल होणाऱ्या कोरोना बाधित रूग्णांना योग्य पध्दतीने दाखल करून घेणे, त्या ठिकाणी रूग्णवाहिका तसेच शववाहिकेची आवश्‍यकता असल्यास संबंधित शासकीय विभागाशी समन्वय साधून त्याची पूर्तता करून घेणे, हॉस्पीटलमधील रूग्णांच्या तक्रारींचे निराकरण करणे बंधनकारक केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी 7 खाजगी हॉस्पीटलकरीता चार पर्यवेक्षीय अधिकारी व 14 प्रशासकीय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.

पर्यवेक्षक असे ः

* भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय सांगली

* कुल्लोळी हॉस्पीटल सांगली व मिरज चेस्ट सेंटर मिरज करीता पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे (मो.नं. 9158686123)

* वाळवेकर हॉस्पीटल सांगली व विवेकानंद मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर बामणोली (ता. मिरज) करीता जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एन. बी. कोळेकर (मो.नं.9960687492)

* मेहता हॉस्पिटल टिंबर एरिया सांगली करीता जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे व वॉन्लेस हॉस्पिटल मिरज करीता जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख किशोर जाधव (मो.नं.9422532636)

हॉस्पीटलनिहाय नियुक्त केलेले प्रशासकीय अधिकारी पुढीलप्रमाणे

भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय सांगली

सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेसाठी नायब तहसिलदार गणेश लव्हे (मो.नं. 9689742484) व रात्री 10 ते सकाळी 10 या वेळेसाठी पंचायत समिती मिरज छोटे पाटबंधारे उपविभागाचे शाखा अभियंता ए. जी. चव्हाण (मो.नं. 9405553953)

कुल्लोळी हॉस्पीटल सांगली

सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिक्षक संजय राऊत (मो. 9075377001) व रात्री 10 ते सकाळी 10 या वेळेसाठी मंडल कृषि अधिकारी तासगाव दिपक कांबळे (मो.9405292386)

मिरज चेस्ट सेंटर मिरज

सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेसाठी पंचायत समिती मिरजचे विस्तार अधिकारी (कृषी) अमोल कोळी (मो. 9403964253), रात्री 10 ते सकाळी 10 या वेळेसाठी सहायक संचालक नगररचना सांगली कार्यालयाचे रचना सहायक सौरभ आवटी (मो. 9637455585).

वाळवेकर हॉस्पीटल सांगली 

सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सहायक अभियंता श्रेणी- एस. जी. पाटील (मो.नं. 9404879812) व रात्री 10 ते सकाळी 10 या वेळेसाठी महाराष्ट्र व प्रदुषक यंत्रणा सांगली चे क्षेत्र अधिकारी रोहिदास मातकर (मो.नं. 9552966799)

विवेकानंद मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर बामणोली (ता. मिरज)  

सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेसाठी वन परिक्षण अधिकारी प्रकाश सुतार (मो. 7722015999) व रात्री 10 ते सकाळी 10 या वेळेसाठी पंचायत समिती मिरज शिक्षण विभागाचे अधिक्षक विजयकुमार सोनवणे (मो. 9029030490).

मेहता हॉस्पिटल टिंबर एरिया सांगली

सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेसाठी समाजकल्याण अधिकारी सचिन साळे (मो. 7972221721) व रात्री 10 ते सकाळी 10 या वेळेसाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जे. बी. वरूटे (मो. 9689711777).

वॉन्लेस हॉस्पिटल मिरज  

सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेसाठी नायब तहसिलदार उमेश कोळी (मो. 9764803098) व रात्री 10 ते सकाळी 10 या वेळेसाठी पाटबंधारे उपविभाग मिरजचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, सहायक अभियंता श्रेणी-1 जावेद शेख (मो.9975297806).

या असतील जबाबदाऱ्या

पर्यवेक्षीय अधिकारी यांनी रूग्णांचा प्रवेश व डिस्चार्ज याबाबतीत पर्यवेक्षण करणे, बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम अद्ययावत करून घेणे, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा अधिकाधिक रूग्णांना फायदा करून देण्याबाबत कामकाज करणे, रूग्णालयांचे प्रशासन व इतर शासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय ठेवणे व सुविधा उपलब्ध करून देणे हे कामकाज करावयाचे आहे. प्रशासकीय अधिकारी यांनी रूग्णालयातील बेड संख्येच्या उपलब्धतेप्रमाणे रूग्णांना दाखल करून घेतले जाते अगर कसे याबाबत तसेच प्रशासकीय सर्व कामकाज पाहणे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडील बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम या प्रणालीमध्ये हॉस्पिटलमधील बेड संदर्भातील दैनंदिन माहिती भरण्याचे कामकाज करावयाचे आहे.

याशिवाय 

  • वसंतदादा शासकीय रुग्णालय ः 0233-2374651
  • जिल्हा परिषद सांगली ः 0233-2374900 येथे संपर्क साधावा.
  • बेडबाबतची माहिती जिल्हा परिषदेतील केंद्रावर मिळणार आहे.


कोरोना लसीकरण 

सांगली जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाची सोय 277 ठिकाणी करण्यात आली आहे. त्यात 59 प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सांगली सिव्हिल, मिरज मेडिकल कॉलेज, भारती विद्यापीठ आदींचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, काही खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सोय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com