मृत व्यक्तीच्या नावे झाड लावण्याचा अभिनव उपक्रम

मार्तंडराव बुचुडे
गुरुवार, 28 जून 2018

संगमेश्वर मंदीराच्या प्रांगणात मृत व्यक्तीच्या नांवे एक झाड लावण्याचा ऊपक्रम येथील संगमेश्वर तरूण मित्रांनी सुरू केली आहे. सुमारे सहा महिण्यापेक्षा अधिक काळापासून हा अभिनव ऊपक्रम या मंडळाने सुरू केला आहे. अाता पर्यत अनेक मृत व्यक्तीच्या नावे येथे वृक्षारोपण झाले आहे.

पारनेर - येथील संगमेश्वर मंदीराच्या प्रांगणात मृत व्यक्तीच्या नांवे एक झाड लावण्याचा ऊपक्रम येथील संगमेश्वर तरूण मित्रांनी सुरू केली आहे. सुमारे सहा महिण्यापेक्षा अधिक काळापासून हा अभिनव ऊपक्रम या मंडळाने सुरू केला आहे. अाता पर्यत अनेक मृत व्यक्तीच्या नावे येथे वृक्षारोपण झाले आहे.

पारनेर शहरासह पारनेरच्या वाड्या व वस्त्यावरील सर्व दशक्रीया विधी या संगमेश्वर घाटावर मंदीर परीसरातच होतात. या पुर्वीही तेथे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ताही नव्हता अता मात्र ग्रामपंचायतीने येथे जाण्यासाठी पक्का डांबरी रस्ता केला आहे. येथे अतिशय पुरातन काळातील संगमेश्वराचे मंदीर आहे. ओसाड परीसर  सुशोभित करावा अशी संकल्पना या परीसरात व पारनेर शहरात रहाणाऱ्या भरत औटी, रविंद्र पुजारी, संभाजी औटी, कचरू गंधाडे, राजू काणे व दगडू चेडे आदी मंडळींच्या मनात आली व त्यांनी ती अमलातही आणली. गेल्या सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून ती सुरू आहे.

ज्या व्यक्तीचा दशक्रीया विधी असेल त्या व्यक्तीच्या नावे व त्या व्यक्तीच्या वारसाच्या हस्ते एक झाड लावावयाचे असा ऊपक्रम सुरू केला आहे. पाहता पहाता येथे अनेक झाडांची लागवड झाली आहे. नुकतेच एका दशक्रीयाविधीसाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आले असताना त्यांच्या हस्तेही एक झाड लावण्यात आले आहे. लवकरच या दशक्रीया घाटावर सर्वत्र ऊंच ऊंच झाडे दिसणार आहेत.

विशेष म्हणजे या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या झाडाचा खर्च व त्याला लागणारी संरक्षक जाळी आदीचा खर्चही ही तरूण मंडळीच करत आहेत. शिवाय या झाडाच्या जाळीवर संबधीत मृव्यक्तीचे नावांची पट्टीही लावण्यात येत आहे. मात्र ज्या लोकांना यात आर्थिक मदत करावी असे वाटते त्या वारसदार मंडळीचीही मदत घेतली जात आहे. मात्र, यात जबरदस्ती केली जात नाही.

Web Title: Innovative venture to plant trees in the names of the dead person