17 गावातील पावणे सहाशे लोकांची तपासणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

संख (सांगली) ः संख आरोग्य केंद्रात 17 गावाततील बाहेरून आलेल्या 585 नागरिकांची माहिती मिळविण्यात आली आहे.या सर्व नागरिकांची तपासणी करण्यात आल्याचे आरोग्य केंद्राच्यावतीने सांगण्यात आले. 

संख (सांगली) ः संख आरोग्य केंद्रात 17 गावाततील बाहेरून आलेल्या 585 नागरिकांची माहिती मिळविण्यात आली आहे.या सर्व नागरिकांची तपासणी करण्यात आल्याचे आरोग्य केंद्राच्यावतीने सांगण्यात आले. 

देशभरात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असल्याने जत तालुक्‍यातील देशभरात रोजगारासाठी गेलेले सुमारे पाच हजार कुटुंबे तालुक्‍यात परतले आहेत. कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या पार्श्वभूमीवर जत पूर्व भागातील विविध गावात बाहेरून आलेल्या सर्व नागरिकांची माहिती आरोग्य विभागाकडे उपलब्ध झाली आहे. 

यात सर्वाधिक संख्या जत पूर्व भागातील असून संख, उमदी, कोंतेवबोबलाद या प्राथमिक आरोग्य केंद्राकडून नवीन आलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्यात येत आहे. त्यानुसार संख प्राथमिक आरोग्य केंद्राकडून माहिती मिळाली असून त्यात संख 58, खंडनाळ 68, अंकलगी 18, गोंधळेवाडी 41, दरीबडची 37, लमाणतांडा 14, सिद्धनाथ 15, तिल्ल्‌याळ 59, आसंगी तुर्क 32, धुळकरवाडी 1, मोठेवाडी 34, पांडोझरी 15, पांढरेवाडी 14, जालीहाळ 18, मुचंडी 82, दरिकोनुर 47, (जत) आसंगी 32 असे मिळून 585 बाहेरून आलेल्या लोकांची नोंद घेतल्याची माहिती केंद्राचे सुपरवायझर डी. ए. चुलपर यांनी दिली. 

कोरोना कक्षाची स्थापना 
संख प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना कक्षाची स्थापना करण्यात स्थापना करण्यात आली असून याठिकाणी कोरोना बाधित रुग्णांसाठी दोन बेडचा बाधित रुग्णांसाठी दोन बेडचा स्थापना करण्यात आला असल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspection of six hundred people in 17 villages