विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना पितृशोक

अतुल पाटील
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

सांगली : नारायणराव नांगरे-पाटील (वय 79) यांचे मंगळवारी (ता. 4) दुपारी एक वाजता कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचे ते वडील होत.

नारायणराव नांगरे पाटील यांचे कोकरूड (ता शिराळा, जि. सांगली) हे मुळगाव. या भागातील प्रसिद्ध पैलवान अशी त्यांची ओळख होती. राजकारणात ठसा उमटवताना कोकरूड गावचे सरपंच ते शिराळा पंचायत समितीचे सभापती अशी पदे भूषवली. तसेच, विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे ते खंदे समर्थक म्हणूनही परिचित होते. औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योजक पद्माकराव मुळे यांचे व्याही होत.

नारायणराव नांगरे-पाटील यांच्यावर कोल्हापूर येथे पंधरा दिवसांपासून उपचार सुरू होते. अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. कोकरूड या मूळगावी सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: Inspector General of police Vishwas Nangare Patil s Father Passed away