vidhan sabha 2019 : 'ईव्हीएम ठेवल्या जाणाऱ्या गोदामात सीसीटीव्ही बसवा'

ncp.jpg
ncp.jpg
Updated on: 

बारामती शहर : विधानसभा निवडणूकीच्या मतदानानंतर ईव्हीएम यंत्रांमध्ये फेरफार होऊ नये या साठी मोबाईल जॅमर बसविण्याची तसेच पक्षीय स्तरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची परवानगी बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांचे निवडणूक प्रतिनिधी किरण गुजर यांनी आज या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना एक पत्र देत ही मागणी केली आहे. 

या पत्रात गुजर यांनी नमूद केले आहे की, 21 ऑक्टोबरला मतदान संपल्यावर सर्व ईव्हीएम मशिन्स एमआयडीसीतील वखार मंडळाच्या गोदामात ठेवली जाणार आहेत. ही मशिन्स 24 ऑक्टोबरलाच मतमोजणीच्या वेळेस बाहेर काढली जातील. 

ईव्हीएम मशिन हॅक करणारी यंत्रणा किंवा हॅकर हॅकिंग करुन उमेदवारांना मिळणाऱ्या मतदानात फेरफार करु शकतात अशी शक्यता असल्याने ही यंत्रणा कोणीही हॅक करु नये या साठी मतमोजणी संपेपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला या गोदामाच्या ठिकाणी जॅमर बसविण्याची परवानगी मिळावी.

दरम्यान, मतमोजणी दिवशी गोदामाच्या परिसरातील मोबाईल कंपन्यांचे टॉवर मतमोजणी होईपर्यंत बंद ठेवावेत, तसेच 21 ते 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पूर्ण होईपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचीही परवानगी द्यावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. 

निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष -
बारामतीतून सीसीटीव्ही कॅमेरे तसेच जॅमर बसविण्याची परवानगी मागितली गेल्याने आता निवडणूक आयोग या बाबत काय निर्णय घेतो या कडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पारदर्शकपणे ही प्रक्रीया पार पाडावी या साठी ही परवानगी आयोगाने द्यायला हवी अशी अपेक्षा किरण गुजर यांनी व्यक्त केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam additional water demand for Sangli
Sangli District Bank Election Strategy
Woman Allegedly Extorted of ₹17 Lakh
Gopichand Padalkar sangli jilha bank
Marathi News Esakal
www.esakal.com