मालवाहतूक वाहनाच्या अपघातानंतर वीमा दावा फेटाळला जातो, कारण... 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या आसन क्षमता नोंदणीत बदल करून घ्यावा. तो बदल न केल्यामुळे अनेक अपघातग्रस्त वाहनांचा वीमा दावा आणि भरपाई मिळण्यात अडचणी येत आहेत.

सांगली ः मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या आसन क्षमता नोंदणीत बदल करून घ्यावा. तो बदल न केल्यामुळे अनेक अपघातग्रस्त वाहनांचा वीमा दावा आणि भरपाई मिळण्यात अडचणी येत आहेत. ही सुधारणा उपप्रादेशिक परिवहन विभागातून करावी घ्यावी, असे आवाहन जिल्हा वाहतूकदार संघटनेतर्फे महेश पाटील यांनी केले आहे. 

ते म्हणाले, ""मालवाहतूकदार नवीन वाहन चेसिस स्वरुपात खरेदी करतो. असे चेसिस स्वरुपात मालवाहतूक वाहन खरेदी केल्यानंतर त्याचे सीआरटीएम हे सध्या ऑनलाइन पद्धतीने नोंदवले जाते. वाहन विक्रेते, उत्पादक परिवहन विभागात ते सादर करतात. वाहन उत्पादक "सीआरटीएम'साठी ऑनलाइन अर्ज करतात. त्यात विक्री केलेल्या वाहनाचा तपशील परिवहन विभागात सादर करताना वाहनाची आसनक्षमता "एक' अशी सादर करत आहेत. चेसिस वरती बॉडी बांधल्यानंतर आसन क्षमता दोन ड्रायव्हर व एक क्‍लीनर इतकी होते.'' 

ते म्हणाले, ""मालवाहन चेसिसवर बॉडी बांधल्यानंतर मालक वाहन नोंदणी करण्यासाठी परिवहन विभागात अर्ज करतात. त्यावेळी आसन क्षमता दोन चालक आणि एक लक्‍लिनर अशी नोंदणी अर्जात नमूद करणे आवश्‍यक आहे. तसे केले नसल्यास वाहनाच्या उत्पादकाने सीआरटीएमवेळी पुरविलेल्या माहितीनुसार आसनक्षमता एक इतकीच राहते. वाहनाचा अपघात झाल्यानंतर मोटर मालक विमा भरपाई सादर करतात. अशावेळी विमा कंपन्यांकडून नोंदणी पुस्तिकेवर आसनक्षमता दोन चालक, एक क्‍लिनर इतकी नसल्याने विमा दावा आणि भरपाई नाकारली जात आहे. मालवाहतूकधारांनी वाहनाची आसनक्षमता बदलून घ्यावी. आसनक्षमता एक असल्यास अपघात होण्यापूर्वी परिवहन विभागात अर्ज करून वाहनाची आसन क्षमता दोन अधिक एक करून घ्यावी.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Insurance claim is rejected after a cargo vehicle accident, because ...

Tags
टॉपिकस
Topic Tags: