esakal | महाराष्ट्र राज्याला जोडणारे आंतरराज्य मार्ग बंद; कोडणीत ब्लॅक फंगसचा शिरकाव
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र राज्याला जोडणारे आंतरराज्य मार्ग बंद

महाराष्ट्र राज्याला जोडणारे आंतरराज्य मार्ग बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोडणी (निपाणी) : कोडणी (Kodani) गावात कोरोनापाठोपाठ चार ते पाच ब्लॅक फंगसचे (Black fungus) रुग्ण आढळून आल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झाले आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महाराष्ट्र (Maharashtra) राज्याला जोडणारे आंतरराज्य मार्ग आज बुधवारी (ता. ७) सायंकाळी बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले आहेत.

हेही वाचा- Photo : महाराष्ट्र आणि देशातील वारकऱ्यांसाठी; आठवणीतील वारी

यापूर्वी गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्या पाठोपाठ आता ब्लॅक फंगसचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावात चार ते पाच रुग्ण आढळले असून परिसरातील कोडणी- चिखली, नाजूक नगर, नरसोबा नगर याठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. यावेळी विनायक दावणे, रावसाहेब शिरगावे, ग्रामपंचायत सदस्य अशोक महाजन, गणपती खोत, सुनील खवरे, राजू कानडे, राजू शिंदे, रघुनाथ हनिमनाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

loading image
go to top