राज्यसभेसाठी इरण्णा कडाडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी निष्ठावंत इरण्णा कडाडी यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.

बेळगाव - भाजपचे अधिकृत उमेदवार इरण्णा कडाडी यांनी आज (ता.9) राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज बंगळूर येथे दाखल केला. विधानसभेच्या सचिव एम. के. विशालाक्षी यांना उमेदवारी अर्ज सुपूर्द केला.

राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी निष्ठावंत इरण्णा कडाडी यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानुसार आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, भाजपचे राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील, पालकमंत्री रमेश जारकीहोळी, कन्नड आणि सांस्कृतिक मंत्री सी. टी. रवी उपस्थित होते. राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास आला आहे. यासाठी परत त्यांनाच उमेदवारी घोषित होण्याची अटकळ बांधली जात होती. पण, तसे घडले नाही. आमदार उमेश कत्ती यांचे बंधू रमेश कत्ती यांच्या उमेदवारीचीही चर्चा होती. पण, लोकसभापाठोपाठ राज्यसभा निवडणुकीतही कत्ती बंधूंना डावलत श्री कडाडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

वाचा - वर्णद्वेषाविरोधासाठी हा खेळाडू 755 कोटी रुपये करणार आहे दान... कोण आहे तो दानशूर...?

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Iranna Kadadi files nomination for Rajya Sabha