Ishwarpur IT Park Project : सांगलीकरांसाठी खूशखबर! शरद जोशींच्या नावाने ईश्वरपुरात 'आयटी पार्क'; 250 कोटींच्या निधीला मंजुरी, आमदार सदाभाऊंची मोठी घोषणा

Maharashtra Approves ₹250 Crore IT Park in Ishwarpur : ईश्वरपूर येथे २५० कोटींच्या आयटी पार्क आणि डेटा सेंटरला राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती, औद्योगिक गुंतवणूक आणि वाळवा तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
Maharashtra IT Park investment project

Maharashtra IT Park investment project

esakal

Updated on: 

ईश्वरपूर (सांगली) : शहरात ‘आयटी पार्क’ व ‘डेटा सेंटर’ उभारण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली (Ishwarpur IT Park project Maharashtra) आहे. यासाठी २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेतकरी चळवळीचे नेते शरद जोशी यांच्या नावाने हे पार्क उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com