ईश्वरपूर : उरुण-ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटील यांनी नगराध्यक्षपद व २२ नगरसेवक भरघोस मतांनी निवड़ून आणत भाजप मित्रपक्षांना धूळ चारली..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होऊनही जयंत पाटील यांच्या धुरंधर चालीसमोर भाजप महायुतीचे स्थानिक नेते अपयशी ठरले. जयंत पाटील यांच्या या विजयामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या पारंपरिक विरोधकांना जमिनीवर आणले. विजयानंतर जयंत पाटील समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजीसह गुलाल उधळत घोषणाबाजीने शहर दणाणून सोडले..Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 : राज्यात कुठं कुणाचा नगराध्यक्ष? दिवसभरातील निकालासंदर्भातील घडामोडी वाचा एका क्लिकवर....आज सकाळी दहा वाजता येथील तहसील कार्यालयात मतमोजणीस सुरुवात झाली. प्रारंभी प्रभाग क्रमांक एकचा निकाल घोषित झाला. यात भाजपमधून जयंत पाटील यांच्या गटात प्रवेश केलेल्या विजय कुंभार व सुप्रिया पाटील यांची मतमोजणी समोर आली. .त्यात विजय कुंभार निसटत्या मतांनी पराभूत झाले, तर सुप्रिया पाटील विजयी झाल्या. शिवसेनेच्या सचिन कोळेकर यांनी खाते उघडले, तर सर्वांत शेवटी प्रभाग क्रमांक १५ ची मतमोजणी झाली. यात पाच बूथपर्यंत अत्यंत चुरशीची लढत सुरू होती. शेवटचा बूथ मोजल्यानंतर जयंत पाटील गटाच्या दोन्ही जागा विजयी झाल्या. .Nagar Palika Election Result: मंचर नगराध्यक्षपदाची लढतीत शिवसेनाच्या राजश्री दत्ता गांजाळे विजयी.आजच्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदासह २३ जागा निवडून आल्या, तर भाजप ३, राष्ट्रवादी (अजित पवार गट) ३ व शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) २ जागांवर समाधान मानावे लागले. नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या आनंदराव मलगुंडे यांना २६ हजार ६२६ मते मिळाली, तर विरोधातील भाजपच्या विश्वनाथ डांगे यांना १९ हजार २९७ मते मिळाली. मलगुंडे यांना ७३२९ चे मताधिक्य मिळाले..दोघे बंधू सभागृहातभाजपचे विक्रम पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, एम. डी. पवार यांचे नातू वैभव पवार, भाजपमधून जयंत पाटील गटात प्रवेश केलेले विजय कुंभार, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांचा पराभव झाला, तर माजी नगराध्यक्ष अरुणादेवी पाटील, सुभाष सूर्यवंशी, आनंदराव मलगुंडे यांंनी पुन्हा विजय मिळवला. नुतन नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचे बंधू सुनील मलगुंडे हेही निवडून आल्याने दोघा बंधूंचा पालिका सभागृहात प्रवेश झाला. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.