Minor Girl Case in Ishwarpur Sangli
esakal
ईश्वरपूर (सांगली) : येथे अल्पवयीन मुलीवर परिचयातील दोघा तरुणांनी अमानुषपणे लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार (Minor Girl Case in Ishwarpur Sangli) मंगळवारी रात्री घडला. पीडितेला अत्याचार करून त्याच अवस्थेत टाकून संशयितांनी पोबारा केला. नागरिकांनी तिला आधार देत पोलिसांत नेले. याप्रकरणी आशिष जयवंत खांबे (वय २६, खांबे गल्ली, उरुण ईश्वरपूर) व ऋतिक दिनकर महापुरे (२७, आष्टा नाका, खांबे मळा, ईश्वरपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांना अटक केली आहे.