Ishwarpur Sangli dowry death case
esakal
ईश्वरपूर (जि. सांगली) : अडीच लाख रुपयांच्या हुंड्यासाठी २१ वर्षीय गर्भवतीला मारहाण करून, गळा दाबून तसेच धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुन्नीबानू मेहबूब खान (वय २१, रा. अकबर मोहल्ला, ईश्वरपूर) असे मृत गर्भवतीचे नाव (pregnant woman dowry killed case Sangli) आहे. ईश्वरपूर पोलिस ठाण्यात संशयित पती मारीफ उर्फ मुझफर रमजान खान, सासरे मोहम्मद रमजान जमाल खान, सासू साबिरा रमजान खान यासह अल्पवयीन नणंदेवर गुन्हा दाखल केला आहे.