Islampur : इस्लामपूर, वाळवा तालुक्याला पावसाने झोडपले: वादळी वाऱ्यासह जोरदार सरी; काढणीस आलेल्या शाळू, गव्हाचे नुकसान
Sangli News : प्रारंभी सोसाट्याचा वारा व विजांचा कडकडाट झाला. त्यानंतर पावसाचे जोरदार आगमन झाले. सुमारे अर्धा ते एक तास पाऊस झोडपून काढत शाळू व गहू काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
"Severe weather with heavy rain and strong winds causes significant damage to crops in Islamapur and Walwa talukas."Sakal
इस्लामपूर : इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यातील बाजूच्या गावांना वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. दिवसभर असलेल्या प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे गारवा जाणवला. मात्र शाळू व गहू काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.