
इस्लामपूर : येथील बस स्थानक परिसरात आज दुपारी चालू गाडीत असलेल्या सीएनजी सिलिंडरमधून अचानक गळती सुरू झाल्याने पंधरा ते वीस मिनिटांचा थरार आज नागरिकांनी अनुभवला. अचानक झालेला मोठा आवाज आणि सिलिंडरमधून बाहेर पडणारा सीएनजी यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. वीस मिनिटांनी गॅस गळती थांबल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. काही काळ वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक यंत्रणा ठप्प झाली होती.