इस्लामपुरात अधिकाऱ्यांनीच उडवला सोशल डिस्टन्सचा फज्जा

पोपट पाटील 
Tuesday, 25 August 2020

इस्लामपूर : शहरात प्रशासनाने तीन दिवस लॉकडाऊन जाहीर केला आहे. तरीही जिल्हा परिवहन विभागाने आज प्रांत कार्यालयासमोरच ड्रायव्हिंग लायसन, वाहन परवाना यांचा मेळावा घेतला.

इस्लामपूर : शहरात प्रशासनाने तीन दिवस लॉकडाऊन जाहीर केला आहे. तरीही जिल्हा परिवहन विभागाने आज प्रांत कार्यालयासमोरच ड्रायव्हिंग लायसन, वाहन परवाना यांचा मेळावा घेतला. शासनाच्या अधिकाऱ्यांनीच सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवलेला दिसत आहे. 

वाळवा तालुक्‍यातील कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्याला अटकाव करण्यासाठी आसपासच्या गावातील नागरीक शहरात ये जा करण्यास आळा घालण्यासाठी प्रशासनाने इस्लामपूर शहरात तीन दिवस लॉक डाऊन जाहीर केले. मात्र याला प्रशासनाच्या परिवहन अधिकाऱ्यांनीच मोडती घालत ड्रायव्हिंग लायसन, चारचाकी वाहनाचे परवाने याकरिता मेळावाच भरविलेला दिसत आहे. 

या ठिकाणी कोणीही सोशल डिस्टन्स चा अवलंब करताना दिसत नाही. जो प्रशासनाचा हेतू होता तोच असफल होतो की काय असा प्रश्न उभा राहिला आहे. तालुक्‍यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. ग्रामीण भागाचा शहरात मोठा संपर्क असल्याने आणखी कोरोनाचा धोका वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे इस्लामपूर शहरात रविवार ( ता. 23 ) ते मंगळवार ( ता.25 )असे तीन दिवस लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. 

या कालावधीत पहिल्या दिवशी शहरात दुचाकीवरून अनेक नागरिक फिरताना दिसत आहेत. त्यांची संख्या दुसऱ्या दिवशी वाढलेली दिसत आहे. नागरिकांनी लॉक डाऊन चा हेतू लक्षात घेऊन कोरोनाचे सर्वांनी गांभीर्य बाळगून त्याचा अटकाव करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शहरातील सराफ व कापड विक्रेते असोसिएशन यांनी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेऊन शासनास सहकार्य केलेले आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Islampur, the authorities blew up the social distance fuss