इस्लामपूर : ‘हाकेच्या अंतरावर अग्निशामक दलाचे (Fire Brigade) केंद्र असतानाही आमचा आयुष्यभर उभा केलेला प्रपंच जळाला. अग्निशामक दलाची वेळेवर मदत मिळाली असती, तर आमचा प्रपंच वाचला असता. आता आम्ही पूर्ण उघड्यावर आलो,’ या शब्दात इस्लामपूर येथील जळीतग्रस्त योगेश विलास सूर्यवंशी व त्यांच्या कुटुंबीयांनी माजी मंत्री आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासमोर आक्रोश मांडला.