
इस्लामपूर : बारावीच्या विद्यार्थ्यांचा आज पहिला पेपर होता. त्याचे परीक्षा केंद्र असलेल्या येथील केआरपी कॉलेजसमोर लावलेल्या पाच ट्रकमुळे केंद्रावर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. काही विद्यार्थ्यांच्या पायावरून दुचाकीची चाके गेल्याने गोंधळ निर्माण झाला.