
इस्लामपूर : ३३ कोटी ८३ लाखांची महापूरग्रस्तांना मदत
इस्लामपूर: वाळवा तालुक्यात जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापूर, अतिवृष्टी भूसख्खलन यात पावसाच्या पाण्याने पूरग्रस्त शेतकरी, नागरिक अशा ४६ हजार ७४१ आपत्तीग्रस्तांना ३३ कोटी ८३ लाख ६२ हजार १०८ रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे.महापूर, अतिवृष्टी यामध्ये तालुक्यातील नदी काठच्या गावांना गावठाण व शेतीला याचा फटका जास्त बसला होता. शेतातील पिके पूर्ण पाण्याखाली गेली होती. काही ठिकाणी घरे पाण्यात बुडली होती. जनावरांचा निवारा वाहून गेला होता. तालुक्यातील १६ हजार ५०० हेक्टर शेतीचे क्षेत्र महापूर व अतिवृष्टीने बाधित झाले होते. त्यासाठी प्रशासनाने बाधित शेतीला प्रती गुंठा १५० रुपये मदत शेतकऱ्यांच्या बँक खातेवर जमा केलेली आहे.
महापुरात जखमी किंवा मृत झालेल्या अशा व्याक्तीच्या ४ हजार ९७६ कुटुंबाला २४ लाख ८८ हजार रुपयांची मदत शासनाने संबंधित नागरिकांच्या बँक खात्यावर जमा केलेली आहे. पूरबाधित गावातील कचरा हटवण्यासाठी २३ लाख २५ हजार रुपये दिले आहेत. महापुराच्या पाण्यात जनावरांचे नुकसान झालेल्या ३४ लाभार्थ्यांना ८ लाख ५४ हजार रुपयांची रक्कम बँक खातेवर जमा केलेली आहेत. पुराच्या पाण्याने अनेक ठिकाणी राहती घरे, जनावरांचे गोठे यांची पडझड झालेली होती. घर, गोठा पडझड झालेल्यांना अशा ६९२ लाभार्थ्यांना २ कोटी २९ लाख ९८ हजार ४०० रुपये वाटप झाले आहे.
या सर्वांबरोबर अनेक दुकानदार व्यावसायिकांचे फर्निचर, दुकानातील साहित्य पाण्याने वाहून तर काही ठिकाणी पाणी साचल्याने नुकसान झालेल्या अशा ६८८ लाभार्थ्यांना ४२ लाख २१ हजार ३०० नुकसानभरपाई देण्यात आली आहेत. सानुग्रह व स्थलांतरित ४ हजार ९९५ लाभार्थ्यांना ७ कोटी ४८ लाख ३० हजार रुपयाचे अनुदान वाटप केले आहेत.
शासकीय निकषानुसार जे पात्र लाभार्थी आहेत, त्यांना २०२१ ची शासकीय देय मदत त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. १८ मे रोजी संबंधित विभागाची संभाव्य पुराच्या दृष्टीने बैठक आयोजित केलेली आहे.
- प्रदीप उबाळे, तहसीलदार
Web Title: Islampur Flood Victims Riverside Villages
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..