इस्लामपूर मंडई स्थलांतराचा वाद पुन्हा पेटला; विक्रेत्यांचा पालिका आवारात ठिय्या

Islampur Mandai migration controversy flares up again; The vendors sit in the municipal premises
Islampur Mandai migration controversy flares up again; The vendors sit in the municipal premises
Updated on

इस्लामपूर (जि. सांगली)  गणेश भाजी मंडई स्थलांतराचा वाद आज पुन्हा पेटला. पालिका प्रशासनाने पोलिसांची मदत घेत रस्त्यावर भाजी विक्रीसाठी बसणाऱ्या विक्रेत्यांना मज्जाव केला. शिराळा नाका परिसरात उभारलेल्या बाजारगाळ्यात विक्रेत्यांनी भाजी विक्री करावी अशी सुचना देण्यात आली. मात्र व्यापारी व भाजी विक्रेत्यांनी पुर्वीच्याच जागेवर भाजी विक्री करण्याची भुमिका घेत माजी नगरसेवक कपील ओसवाल यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. शिवाय पालिकेच्या आवारात ठिय्या मारला. 

येथील गणेश भाजी मंडई परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून सकाळच्या सत्रात भाजी मंडई भरवली जाते. गणेश मंदिरापासून दर्गा परिसरातील तळ्यापर्यंत तालुक्‍यातून आलेले शेतकरी व व्यापारी रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजी विक्रीसाठी बसतात. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत हा बाजार भरलेला असतो. शहर व परिसरातील नागरिक भाजी खरेदीसाठी येथे येत असतात. बसस्थानकाकडे जाणारा आणि शहरातील हा मुख्य रस्ता असल्याने येथे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.

सणासुदीच्या दिवशी या परिसरात मोठी वर्दळ असते. त्यामुळे पालिकेने या विक्रेत्यांना शिराळा नाका परिसरात उभारण्यात आलेल्या बाजारगाळ्यात भाजी विक्रीसाठी बसण्याचे आवाहन केले. व्यापारी व भाजी विक्रेते मंडई स्थलांतरास विरोध करीत आहेत. यापुर्वीही मंडई स्थलांतरासाठी पालिकेकडून प्रयत्न झाले आहेत.

त्यावेळीही विक्रेते व व्यापाऱ्यांनी याला विरोध केला होता. आज पालिका प्रशासनाने पोलिसांची मदत घेत गणेश मंडई परिसरात विक्रेत्यांना बसण्यास मज्जाव केला. या परिसरात बॅरेकेड्‌स लावून विक्रेत्यांना शिराळा नाका परिसरात जाण्याच्या सुचना देण्यात आल्या. 

गेल्या कित्येक वर्षापासून गणेश मंडई परिसरात भाजी विक्रेते बसत आहेत. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनाही या मंडईची सवय झाली आहे. अन्यत्र मंडईसाठी ग्राहकांचा प्रतिसाद मिळणार नाही, त्यामुळे पालिकेने आहे त्याच जागेवर विक्रेत्यांना भाजी विक्रीसाठी परवानगी द्यावी अशी विक्रेत्यांची मागणी आहे.

विक्रेत्यांनी पालिका आवारात माजी नगरसेवक कपील ओसवाल यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. नवी जागा व तिथे सोयीसुविधा अपुऱ्या आहेत, स्थलांतराला स्थगिती द्यावी अशी भुमिका विक्रेत्यांनी मांडली. शाकीर तांबोळी, मन्सुर मोमीन, सोमनाथ फल्ले, उपस्थित होते. विक्रेत्यांनी मुख्याधिकारी अरविंद माळी यांना निवेदन दिले. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com