जयंत पाटील (Jayant Patil) गटाला घासून मिळालेला विजय व निशिकांत पाटील यांच्या गटाला निसटता झालेला पराभव जिव्हारी लागला.
इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीनंतर (Islampur Assembly Election) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे निशिकांत पाटील (Nishikant Patil) यांनी समर्थकांच्या चिंतन बैठका घेऊन ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा’ असा संदेश दिला आहे. जयंत पाटील (Jayant Patil) गटाला घासून मिळालेला विजय व निशिकांत पाटील यांच्या गटाला निसटता झालेला पराभव जिव्हारी लागला. इस्लामपूर नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांत आता काटे की टक्कर होऊन अस्तित्वाची लढाई सुरू होणार असल्याने तालुक्यात मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची स्थिती आहे.