इस्लामपुरात शिवसैनिक आक्रमक: नगरपालिकेची तिसरी विशेष सभाही रद्द! Sangli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इस्लामपुरात शिवसैनिक आक्रमक: नगरपालिकेची तिसरी विशेष सभाही रद्द!

इस्लामपुरात शिवसैनिक आक्रमक: नगरपालिकेची तिसरी विशेष सभाही रद्द!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर ( सांगली) : शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून आणलेल्या अकरा कोटींच्या निधीला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केल्याच्या निषेधार्थ नगरसेवकांच्या दारात जाऊन ढोल- ताशा गजर आंदोलन करण्याचा निर्णय शिवसेना (Shivsena) आणि विकास आघाडीने घेतला आहे. आज पालिकेत तिसरी विशेष सभा झाली. त्या सभेलाही राष्ट्रवादीने गैरहजेरी लावल्याने ही सभा रद्द करावी लागली. सभेनंतर विकास आघाडीच्या १३ नगरसेवकांनी मिळून ११ कोटी रुपयांचा विकासकामांचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांना पाठवण्याचे निवेदन नगराध्यक्ष निशिकांत पाटील (Nishikant Patil) यांना दिले.

निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी या निधीचा योग्य विनियोग व्हावा आणि शहरात विकासकामे व्हावीत यासाठीचा प्रस्ताव आता जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला शहराच्या विकासाची देणेघेणे नाही. नागरिकांच्या विकासाचा निधी त्यांना नको आहे. आनंदराव पवार यांनी हा निधी आणल्यामुळे राष्ट्रवादी त्याला विरोध करत आहे आणि या निधीचा योग्य वापर व्हावा यासाठी आम्ही परिपूर्ण प्रयत्न करू असे सांगत नगराध्यक्षांनी राष्ट्रवादीवर टीका केली.

राष्ट्रवादीला आम्ही आणलेल्या निधीचा पोटशूळ उठलेला आहे. हे काम बंद पाडण्याचा त्यांचा हेतू असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते आनंदराव पवार यांनी केला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना जाग आणण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत असे त्यांनी सांगितले. केवळ शिवसेनेने आणलेला हा निधी असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करत आहे. त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांना जनतेसमोर जाता येणार नाही. जनतेच्या मनात त्यांच्याविरोधात प्रचंड असंतोष आहे. आता जनता त्यांना दारात उभे करणार नाही, अशी टीका विक्रम पाटील यांनी यावेळी केली.

loading image
go to top