Islampur Dharmguru : इस्लामपूरच्या धर्मगुरूंचा अपघातात जागीच मृत्यू; टायर फुटल्याने गाडी खांबावर आदळली अन्...

Islampur Dharmguru Accident : यातील समी मुल्ला हे गंभीर जखमी आहेत. काल दुपारी चारच्या सुमारास अपघात झाला. याबाबत रात्री उशिरा ग्रामीण पोलिस ठाण्यात (Sangli Police) गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
Islampur Dharmguru Accident
Islampur Dharmguru Accidentesakal
Updated on
Summary

अपघात इतका भीषण होता की नव्याने उभारण्यात आलेला विद्युत खांब अक्षरशः घटनास्थळी वाकला होता. ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला असून याबाबतची नोंद केली आहे.

सांगली : येथील लक्ष्मी फाट्यानजीक (Lakshmi Phata Accident) चारचाकी गाडीचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात इस्लामपूर येथील धर्मगुरूंचा (Islampur Dharmguru) जागीच मृत्यू झाला. हफीज अलीम मन्सूर बारस्कर (वय ५०, रा. इस्लामपूर) असे त्यांचे नाव आहे. तर तिघे जखमी झाले. अस्लम मिस्त्री (६२), समीर सरवर मुल्ला (५०), फैय्याज लीयाकत इबुशी (५२ सर्व रा. इस्लामपूर) अशी त्यांची नावे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com