इस्लामपूर वाळवा पंचायत समितीमध्ये कोरोनाचा शिरकाव...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 August 2020

उपअभियंता सांगली येथे वास्तव्यास होते. इस्लामपूर कार्यालयात ये जा करत होते.

इस्लामपूर (सांगली) : येथील वाळवा पंचायत समिती मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंताला कोरोना तपासणी अहवाल रात्री पॉझिटिव्ह आला आहे.

हेही वाचा- .इचलकरंजीत रुग्णसंख्या हजारच्या पुढे ; मृतांचे अर्धशतक पार -

हा अहवाल येताच प्रशासनाने तत्काळ उपाययोजना हाती घेतल्या असून सोमवारी कुणीही पंचायत समितीच्या कोणत्याही विभागाशी संपर्क टाळावा असे आवाहन गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले आहे.

हेही वाचा- ...तरच कोल्हापुरातील कोरोना रूग्णांची संख्या होईल कमी -

हे उपअभियंता सांगली येथे वास्तव्यास होते. इस्लामपूर कार्यालयात ये जा करत होते. त्यामुळे धोका वाढला असून आता खबरदारी घेतली जाणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. दरम्यान वाळवा तालुक्यात काल आणखी चार जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यामध्ये इस्लामपूर, ताकारी व मसुचिवाडी येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यांच्यावर मिरज येथे उपचार सुरू आहेत.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Islampur Valva Panchayat Samiti corona virus infected