Islampur Crime : इस्लामपूर येथे दोन गटांत तुफान हाणामारी: दोन्ही बाजूच्या नऊ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल
शुभम पवार व योगेश पवार या दोघांनी अक्षय यांना कोयत्याच्या लोखंडी मुठीने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दोन्ही बाजूच्या नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
Police have arrested nine individuals following a violent brawl between two groups in Islampur. Cases have been filed, and authorities are investigating the incident.Sakal
इस्लामपूर : पाणीपुरवठा संस्थेशी संबंधित हौदावरील पाण्याचा व्हॉल्व्ह खोलून पाणी सोडण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांत झालेल्या भांडणात शिवीगाळ व लाथाबुक्की, तसेच कोयत्याच्या मुठीने मारहाण केल्याप्रकरणी दोन्ही बाजूच्या नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.