"युपीएससी'त इस्लामपुरचा झेंडा; निमीष पाटील देशात 389 वा 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

निमिष यांचे प्राथमिक शिक्षण येथील डॉ. व्ही. एस. नेर्लेकर प्राथमिक विद्यालयात झाले.

इस्लामपूर (सांगली) ः केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत येथील निमीष दशरथ पाटील यांनी देशात 389 वा क्रमांक मिळवला. 

निमिष यांचे प्राथमिक शिक्षण येथील डॉ. व्ही. एस. नेर्लेकर प्राथमिक विद्यालयात झाले. माध्यमिक शिक्षण आदर्श बालक मंदिर हायस्कूल येथे झाले. चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतही त्यांनी यश संपादन केले होते. 

एमटीएस परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त केली होती. मुंबईच्या सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनीअरींग मधून मेकॅनिकल इंजिनीअरींगची पदवी घेऊन त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी थेट दिल्ली गाठली. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले. 

पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नात ते मुलाखतीपर्यंत गेले. मात्र अंतीम यश आले नाही. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवले. अभ्यासातील सातत्य, चिकाटीजिद्द आणि पालकांचे प्रोत्साहन यामुळे हे यश प्राप्त झाले अशी प्रतिक्रीया निमिष पाटील यांनी व्यक्त केली. केआरपी कन्या महाविद्यालयातील प्रा. दशरथ पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. आज निकाल समजताच निमीष यांच्या वर्गमित्रांनी गुलालाची उधळण केली. 
 
संपादन ः धर्मवीर पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Islampur's flag at UPSC; Nimish Patil 389th in the country