महिला सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर : ऍड. स्वाती शिंदे...भाजपा महिला आघाडीच्यावतीने सरकारचा निषेध

बलराज पवार
Tuesday, 22 September 2020

सांगली-  महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यातील काही कोविड सेंटर व कोविड हॉस्पिटलमध्ये विनयभंग व बलात्काराचे प्रकार घडले आहेत. मात्र याबाबत शासन कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याबद्दल भाजपा महिला आघाडीच्या वतीने आज सरकारचा निषेध करण्यात आला. जिल्हाध्यक्षा ऍड. स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, महापालिका उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. 

राज्यात कोरोनाचे संकट मोठे आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी हॉस्पिटल, कोविड सेंटरमध्ये महिलाही दाखल आहेत. गेल्या काही दिवसात अशा काही ठिकाणी अत्याचार, विनयभंग, बलात्काराच्या घटना घडल्या. या घटना संतापजनक आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. याचा निषेध म्हणून आज भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. 

सांगलीत महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष ऍड. स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिलांची सुरक्षा धोक्‍यात असल्याचे व भविष्यामध्ये कराव्या लागणाऱ्या उपाय योजनांकरिता जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांना राज्य सरकारच्या विरोधात निवेदन देण्यात आले. तसेच शहरातील कोविड सेंटरमध्येही महिलांच्या सुरक्षेसाठी गस्ती पथक, महिला पोलिसांची नेमणूक, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अशा उपाय योजना करण्याची मागणी ऍड. स्वाती शिंदे यांनी केली. 
यावेळी ज्योती कांबळे, रूपाली देसाई, माधुरी कापसे, निकिता चव्हाण उपस्थित होत्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The issue of women's safety is serious. Swati Shinde: BJP Women's Front protests against the government