ब्रेकिंग! दुचाकीवर दोघांना परवानगी मात्र हेल्मेट घालणे बंधनकारक 

तात्या लांडगे
Friday, 31 July 2020

आदेशातील ठळक बाबी... 

  • जीवनावश्‍यक वस्तू नसलेल्या वस्तू खरेदीसाठी लांब जाण्यास मनाई -
  • गॅरेज, वर्कशॉपमधील वाहनांची दुरुस्ती करण्यापूर्वी अगोदर ठरवावी वेळ 
  • उत्तरपत्रिका मूल्यांकन, निकालासह शैक्षणिक कामकाजास परवानगी 
  • दुचाकीवर चालकासह दोघे, रिक्षात तिघे तर चारचाकीत चौघेच असणे बंधनकारक

सोलापूर : राज्य सरकारने राज्यातील लॉकडाउनची मुदत आता 31 ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. त्यानुसार सोलापूर महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी नव्याने आदेश काढत दुचाकीस्वारांना डबलसीट प्रवास करण्यास परवानगी दिली. मात्र, त्यांना हेल्मेट आणि मास्क घालणे बंधनकारक राहणार आहे. दुसरीकडे शहरातील मॉल्स्‌, मार्केट, कॉम्प्लेक्‍स तर फूडकोर्ट, रेस्टॉरंट यांचे किचन केवळ होम डिलिव्हरीसाठी 5 ऑगस्टपासून सुरु होईल, असेही त्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

 

बाह्य भागातील संघ नसेलेले क्रिडा प्रकारालाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये गल्फ, बाह्य फायरिंग रेंज, आउट डोअर मिम्नॅस्टिक्‍स, टेनिस, आउट डोअर बॅडमिंटन, मल्लखांब या खेळांचा समावेश आहे. मात्र, त्यांना सुरक्षित अंतर पाळणे आणि सॅनिटायझिंगचे बंधन असणार आहे. तसेव केश कर्तनालये, स्पा, सलून, ब्युटी पार्लर पूर्वीप्रमाणे सुरु राहतील. त्यांना अटी व शर्थीचे पालन करणे बंधनकारक आहे. वृत्तपत्र छपाई व वितरणास पूर्वीची परवानगी कायम ठेवण्यात आली आहे. खाद्यगृहे व रेस्टॉरंटमधील सेवा घरपोच करण्यास मुभा देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयात 15 टक्‍के तर खासगी कार्यालयात 10 टक्‍के कर्मचारी ठेवण्यास परवानगी असणार आहे. दरम्यान, परवानगी देण्यात आलेल्या आस्थापनास केंद्र व राज्य सरकारच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल, असेही महापालिका आयुक्‍तांनी स्पष्ट केले आहे. 

 

आदेशातील ठळक बाबी... 

  • जीवनावश्‍यक वस्तू नसलेल्या वस्तू खरेदीसाठी लांब जाण्यास मनाई -
  • गॅरेज, वर्कशॉपमधील वाहनांची दुरुस्ती करण्यापूर्वी अगोदर ठरवावी वेळ 
  • उत्तरपत्रिका मूल्यांकन, निकालासह शैक्षणिक कामकाजास परवानगी 
  • दुचाकीवर चालकासह दोघे, रिक्षात तिघे तर चारचाकीत चौघेच असणे बंधनकारक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is mandatory for both of them to wear helmets on the bike