सामंतांना पालकमंत्रीपद दिले पण...

It is reported that Uday Samant has been given a threat by the Guardian Minister of Ratnagiri district kokan marathi news
It is reported that Uday Samant has been given a threat by the Guardian Minister of Ratnagiri district kokan marathi news
Updated on

चिपळूण (सिंधुदुर्ग) - ठाकरे सरकार मधील मंत्रिपदावरून जिल्ह्यात गाजलेल्या नाराजीनाट्यामुळे शिक्षण मंत्री उदय सामंत यांना रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाने हुलकावणी दिल्याची चर्चा आहे. सामंत यांना रत्नागिरीएैवजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. परिवहनमंत्री अ‍ॅड अनिल परब यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री करत ठाकरेंनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत.

शिवसेनेच्या वाट्याला कमी मंत्रीपदे

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार याची खात्री झाल्यानंतर जिल्ह्यात मंत्रीपद आणि पालकमंत्रीपदाची चर्चा सुरू होती. ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाला जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळेल, असे महाविकास आघाडीचे सूत्र ठरले होते. मंत्रीपदासाठी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, गुहागरचे आमदार भास्कर जाधव आणि राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यात चुरस होती. विधीमंडळातील अनुभवामुळे भास्कर जाधव मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र सरकार स्थापन करण्यासाठी तीन पक्ष एकत्र आले. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या वाट्याला कमी मंत्रीपदे आली. त्यामुळे जाधव यांच्यासह राजन साळवींचे नाव मागे पडले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या युवासेना कोअर कमिटीचे सदस्य असलेले दापोलीचे आमदार योगेश कदम यांनाही संधी मिळाली नाही. मंत्रीपदाने हुलकावणी दिल्यानंतर भास्कर जाधवांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.त्यानंतर पालकमंत्रीपदाची उत्सुकता होती. पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष असतो. जिल्ह्याला येणारा निधी खर्च करण्याचे तसेच आमदार,खासदारांनी शिफरस केलेली कामे मंजूर करण्याचे अधिकारही पालकमंत्र्यांना असतात. जिल्ह्यात भाजपची ताकद नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे जिल्ह्यावर वर्चस्व आहे.

मुंबईतील नेत्याकडे जिल्ह्याची धुरा

शिवसेनेच्या उमेदवारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासमोरच निवडणूका लढवल्या होत्या. सामंत पूर्वी राष्ट्रवादीत होते. त्यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचे प्रेम उफाळून आले तर शिवसेनेतील एक गट नाराज झाला. उदय सामंत यांना पालकमंत्री मिळाले असते नाराज गट सतत सक्रीय राहिला असता. यातून वाद उफाळून आला असता. त्याचे पडसाद महाविकास आघाडीच्या वाटचालीवर झाले असते. हा वाद होऊ नये म्हणून परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली.
यामुळे रवींद्र वायकर यांच्यानंतर अ‍ॅड.परब यांच्या माध्यमातून शिवसेनेने मुंबईतील नेत्याकडे जिल्ह्याची धुरा सोपवली आहे.


अ‍ॅड.सुनिल परब हे अभ्यासू आणि संघटनकौशल्य असलेले शिवसेनेचे नेते आहेत. त्यांचा  रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाली. या निवडीचे स्वागत आहे. अ‍ॅड. परब जिल्ह्याच्या विकासाला चालना देतील. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनाही ते समान न्याय देतील.

प्रतापराव शिंदे, शिवसेना तालुकाध्यक्ष चिपळूण

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com