तो मी नव्हेच... इंदोरीकरांचा खुलासा, पीसीपीएनडीटी म्हणाली, बरं ओके

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

एका यू ट्यूब चॅनलवर इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनातील सारांश प्रसिद्ध झाला होता. त्यावरून गेल्या आठ दहा दिवसांपासून त्यावर महाराष्ट्राचे सामाजिक, राजकीय, धार्मिक, आणि राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. ठराविक तारखांना स्त्री समागम केल्यास अमूक अमूक प्रकारची संतती होते, असे ते विधान होते.

नगर ः  निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी पीसीपीएनडीटी या समितीकडे काल खुलासा केला आहे. मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपल्या वकिलांकडे लेखी म्हणणे मांडले आहे. या खुलाशात महाराजांनी काय म्हटले आहे, या बाबत लोकांना उत्सुकता आहे.

काय झालं होतं नेमकं

एका यू ट्यूब चॅनलवर इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनातील सारांश प्रसिद्ध झाला होता. त्यावरून गेल्या आठ दहा दिवसांपासून त्यावर महाराष्ट्राचे सामाजिक, राजकीय, धार्मिक, आणि राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. ठराविक तारखांना स्त्री समागम केल्यास अमूक अमूक प्रकारची संतती होते, असे ते विधान होते. त्याला अंधश्रद्धा नि्र्मूलन समितीने आक्षेप घेतला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही पोलिसांना निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

गुन्हा दाखल न झाल्यास महाराजांच्या गावात जाऊन त्यांना काळे फासणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. अंनिसचीही हीच भूमिका आहे. मात्र, महाराजांच्या समर्थनासाठी सोशल मीडियातील तरूणाई मैदानात उतरली आहे. नगरच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर यांनीही देसाई यांना शिवराळ भाषा वापरत त्यांचा समाचार घेतला होता. तो व्हिडिओ सोशल मीडियावर कमालाची व्हायरल झाला आहे.

महाराजांसाठी अकोलेकर एकवटले

अकोलेकरांनी रविवारी इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ बंद पाळण्याचे ठरवले आहे. सोमवारी भजन कीर्तन करीत मोर्चाही काढला जाणार आहे. त्या दृष्टीने  नियोजन केले जाते आहे. त्यासाठी गावोगावच्या ग्रामपंचायतींचे ठराव घेतले जात आहेत.

दिलगिरीनंतरही...

दोन दिवसांपूर्वी इंदोरीकर यांनी आपल्या लेटरहेडवर दिलगिरी व्यक्त केली होती. तरीही काही लोकांकडून काही वाक्यांचे भांडवल केले जात असल्याने ते व्यथित झाले होते. गेल्या २६ वर्षांमध्ये त्रास झाला नाही, एवढा त्रास गेल्या दहा दिवसांत झाल्याचेही त्यांनी कीर्तनातून भावना व्यक्त केली होती.

असा आहे खुलासा

दरम्यान महाराजांनी आपल्या वकिलामार्फत पीसीपीएनडीटी समितीकडे खुलासा सादर केला आहे. त्या म्हटले आहे की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात माझे कीर्तनच झालेले नाही. मग आक्षेप आला कुठून. जो व्हिडिओ माध्यमात फिरतो आहे. त्यात छेडछाड झाल्याचाही संशय त्यांनी व्यक्त केला आहे. कोणत्याही विधानाचा सोईनुसार अर्थ काढणे चुकीचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. महाराष्ट्र सरकारने तसेच झी सारख्या वाहिनीने आपल्या प्रबोधनाच्या विचारांचा गौरव केला आहे. अंधश्रद्धेवर नेहमीच प्रहार केल्याचेही त्यांनी आपल्या खुलाशात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.

आरोग्य समिती समाधानी

पीसीपीएनटी समितीने महाराजांच्या खुलाशावर समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी नगर जिल्ह्यात आपण अमूक तारखेला कीर्तन केले होते, याबाबत सवाल विचारला होता. मात्र, महाराजांनी आपले तसे कीर्तनच झालेले नाही. या खुशालाबाबत समिती समाधानी आहे. मात्र, यापुढे काय कारवाई होईल, याबाबत समजू शकले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It's not me Indore's disclosure PCPNDT said OK