हजरत पैगंबरांची अविस्मरणीय शिकवण

हजरत पैगंबरांची अविस्मरणीय शिकवण
Updated on

हजरत मुहम्मद पैगंबरांची विविधांगी रूपे जगासमोर आली आहेत. गोर-गरिबांचे कैवारी, शूरवीर, योद्धे, सेनापती, हुशार व्यापारी, तत्त्वज्ञान व उपदेशाचे सागर. लोकहिताय राजनीती तज्ज्ञ, अनाथ, दीन-दलितांचे व गुलामांचे रक्षक, स्त्री जातीचे उद्धारक, न्यायप्रिय, संत विचारांचे पुरस्कर्ते, आजीवन मानवतेचे व मानवांच्या कल्याणातच जीवनाचे ध्येय समजणारे हजरत मुहम्मद पैगंबर तत्कालीन अंधकारमय जगासाठी आकाशात ध्रुवाप्रमाणे चमकणारा तारा बनून पृथ्वीवर अवतरले होते.

हजरत मुहम्मद पैगंबरांनी केलेली सर्वात श्रेष्ठ सामाजिक सुधारणा म्हणजे त्यांनी केलेला शिक्षण प्रसार. जंगली व पशू बनलेल्या मानवास सुसंस्कृत बनविण्याचे सामर्थ्य फक्‍त शिक्षणात आहे, हे त्यांनी ओळखले होते. हजरत पैगंबर म्हणतात, ‘ज्ञान संपादन करा, कारण नीती व अनिती, न्याय व अन्याय, पाप व पुण्य यातील फरक ज्ञानामुळे कळतो. ज्ञानदीप स्वर्गाकडे जाणारा रस्ता दाखवितो. शिक्षण घेणे हे स्त्री-पुरुषांचे आद्य कर्तव्य आहे. शिक्षणास आयुष्य वाहणारा अमर असतो. पैगंबरांनी मदिना शहरात ‘अल-सुफ्फा’ हे विद्यापीठ सुरू केले, तो चबुतरा आजही मदिना शहरातील मस्जिद-ए-ख्यावी अर्थात पैगंबरांची मस्जिद म्हणून प्रसिद्ध आहे. 

सर्वश्रेष्ठ अल्लाहने आदर्श जीवन म्हणून हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जीवनाचा निर्देश केलेला आहे. पैगंबरांनी स्त्रीभ्रूण हत्येला विरोध करून स्त्री जातीचा सन्मान केला. हजरत मुहम्मद पैगंबरांना अल्लाहने एका धर्मापुरता मर्यादित संदेश देण्यासाठी पाठविले नाही तर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी व ईश्‍वराप्रती श्रद्धेची शिकवणूक देण्यासाठी पाठविले. या वचनांवरून इस्लामची महान विश्‍वबंधुता दिसून येते.

हजरत मुहम्मद पैगंबरांचा संदेश अखिल मानवजातीसाठी आहे. वर्ण, वंश, भाषा, गरीब, श्रीमंत, काळा-गोरा आदी प्रकारच्या भेदांना मूठमाती देऊन प्रत्येक मानवाला एका मानवाच्या रूपात संबोधित करतात. समस्त मानव जात एक आहे. अल्लाहसमोर सर्व समान आहेत. सर्वांना हवा, पाणी, प्रकाश समान आहे. मानवता हीच खरी इस्लामची जीवनपद्धती आहे. मानवांची सेवा हीच अल्लाहची सर्वश्रेष्ठ सेवा होय. असे जो मान्य करेल तो विश्‍वव्यापी मुस्लिम समुदायाचा घटक आहे; मग तो कोणत्याही जातीचा किंवा पंथाचा असो. ज्या देशात आपण जन्मलो त्या देशाच्या कल्याणाची काळजी राहिल्याखेरीज आपला मानवता धर्म परिपूर्ण होत नाही.

आपल्या मातृभूमीवर प्रेम करावे, राष्ट्राप्रमाणेच जगातील सर्व राष्ट्रांवर प्रेम, आपुलकी, मदत, मैत्री करण्याची शिकवण हजरत पैगंबरांनी दिली होती.  हजरत मुहम्मद पैगंबर म्हणतात, ‘‘आईच्या पायाशी स्वर्ग आहे. आई-वडिलांना नाराज करून कोणतेही कृत्य करू नका. मानवजातीच्या उद्धारार्थ प्रत्येक क्षण खर्ची घालणाऱ्या या उज्ज्वल व भाग्यशाली आयुष्याचा शेवट झाला व त्यांचे विचार व आचरणाची मानवजातीला नितांत गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Almatti Dam latest water level update today
Koyna Dam latest water storage update
Sangli monsoon forecast today
Mumbai to Pune political journey
Marathi News Esakal
www.esakal.com