दिलासादायक! कुकडीचे पाणी १ जानेवारीला : आमदार शिंदे 

अण्णा काळे
बुधवार, 18 डिसेंबर 2019

नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. येथे पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार उपस्थित होते.

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील दहीगाव उपसा सिंचन योजनेची आवर्तने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, तर कुकडीचे पाणी १ जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती आमदार संजय शिंदे यांनी दिली आहे.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. येथे पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार उपस्थित होते. 
याबाबत अधिक माहिती देताना आमदार शिंदे म्हणाले,  दिलीप वळसे पाटील, रोहित पवार यांच्यासह इतर अधिकारी व आमदार यांच्या उपस्थितीत नागपूर येथे कुकडी व दहीगावचे पाणी सोडण्याबाबत बैठक झाली. या बैठकीत दहिगाव येथील वीज संदर्भातील ७३ लाख थकबाकी महामंडळातून भरण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे. या पाण्याचा लाभ ज्वारी व इतर पिकांना होणार आहे. तर कुकडीच्या पाण्यासंदर्भात टेल टू हेड निकषाप्रमाणे निर्णय झाला आहे. त्यानुसार ३७ दिवसाचे रोटेशन आहे. प्रथम नऊ दिवस करमाळा तालुका, १३ दिवस कर्जत, १० दिवस श्रीगोंदा, तीन दिवस पारनेर, एक दिवस जुन्नर असे ठरले आहे. प्रथम करमाळा तालुका आहे त्यानुसार १ तारखेला कुकडीच्या पाण्याचे रोटेशन आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On January 1 the water will come out of the kukadi