गोपीचंद पडळकर हे उपरे आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवार न देता जत तालुक्यातील भूमिपुत्राला संधी द्यावी, अशी त्यांची मागणी होती. ती फेटाळून लावत भाजपने पडळकर यांना मैदानात उतरवले.
जत : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) अपक्षाला, तर विधानसभा निवडणुकीत बंडखोर उमेदवाराला पाठिंबा दिल्याच्या कारणावरून जतचे माजी आमदार विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांची भाजपने (BJP) पक्षातून हकालपट्टी केली. जत विधानसभा मतदार संघात बंडखोरी करणारे माजी जि. प. सभापती तम्मनगौडा रविपाटील यांचीही हकालपट्टी करण्यात आली.