जत (सांगली) - शेगाव (ता. जत) येथे सोन्याची डिलिव्हरी देण्यास जात असताना अज्ञात चार चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून, त्यांना मारहाण करत गाडीतील चार किलो 600 ग्रॅम सोने चोरून पळ काढला. मध्यरात्रीनंतर शुक्रवारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. या सोन्याची बाजार भावानूसार किंमत दोन कोटी 26 लाख 13 हजार 500 रूपये इतकी किंमत होते. याबाबत बाळासाहेब वसंत सावंत (रा. पळसखेल, ता. आटपाडी) यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बाळासाहेब सावंत व अन्य एक सहकारी हे गुरूवारी मध्यरात्री बेळगावहून चारचाकी गाडीतून सोन्याची डिलिव्हरी देण्यास जत तालुक्यातील शेगावकडे निघाले होते. काही संशयित मोटारीतून त्यांच्या पाठलागावर होते. जत पासून पाच किलो मिटर अंतरावर असलेल्या माळी वस्तीजवळ लघुशंकेसाठी दोघेजण मोटारीतून उतरले. त्याचवेळी चार लुटारूंनी मोटारीतून त्यांना गाठले.
चौघांनी अंधारात त्यांच्याकडील मिरची पूड बाहेर काढून श्री. सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यात टाकली. त्यानंतर दोघांना मारहाण करण्यास सुरवात केली. मारहाणीनंतर मोटारीत ठेवलेले चार किलो 600 ग्रॅम सोने घेऊन चोरट्यांनी अंधारात पळ काढला. या प्रकारामुळे धक्का बसलेल्या सावंत आणि सहकाऱ्यांनी जत पोलिस ठाणे गाठले. तेथे जबरी चोरीची फिर्याद दिली. लुटमारीची माहिती मिळताच सांगलीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक तत्काळ रवाना झाले. जत पोलिस तसेच जत उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले हे तपास करत आहेत.