Sangli Political News
esakal
जत (जि. सांगली) : शहरातील विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी काल सकाळी बोलाविण्यात आलेली जत नगरपालिकेची मासिक सभा सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री व आमदारांच्या छायाचित्राच्या वादात (Jat Municipality Photo Dispute) अडकली. अजेंड्यावरील विषयांवर चर्चा करण्याऐवजी तब्बल तासभर सभागृहातील छायाचित्रावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. अखेर संतप्त काँग्रेस नगरसेवकांनी सभात्याग केला. मात्र, सत्ताधाऱ्यांनी बहुमताने सभा पुढे चालवली.